NCP Internal Conflict : सुनेत्रा पवारांसमोर तटकरे-भुजबळांमध्ये वादावादी; पार्थ पवार तडकाफडकी निघून गेले, देवगिरी बंगल्यावरील वातावरण तापलं

Chhagan Bhujbal : देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवारांसमोर सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार वादावादी झाल्याची चर्चा असून पार्थ पवार अचानक निघून गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
NCP Internal Conflict Chhagan Bhujbal sunil tatkare sunetra pawar

NCP Internal Conflict Chhagan Bhujbal sunil tatkare sunetra pawar

esakal

Updated on

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे व मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे मुंबईत उपस्थित असूनही बैठकीला गैरहजर राहिल्याची चर्चाही रंगली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com