esakal | VIDEO : सनी लिओनीची आयडीयाची कल्पाना, 30 सेकंदमध्ये मास्क बनवण्याचे देतेय प्रशिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO : सनी लिओनीची आयडीयाची कल्पाना, 30 सेकंदमध्ये मास्क बनवण्याचे देतेय प्रशिक्षण

सनीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घरच्या घरी मास्क तयार केलेल फोटो शेअर केले आहे. तिचे हे फोटो आणि मास्क तयार करण्याची पद्धत नेटकऱ्यांच्याही चांगलीच पसंतीस पडली आहे.

VIDEO : सनी लिओनीची आयडीयाची कल्पाना, 30 सेकंदमध्ये मास्क बनवण्याचे देतेय प्रशिक्षण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळात प्रत्येकजण काही ना काही तरी नव्या गोष्टी शिकत आहे. इतकच काय तर कलाकार मंडळींचा कधी न पाहिलेला अवतार आता त्यांच्या चाहते मंडळींना पाहायला मिळत आहे. आपले आवडते छंद जोपासण्याची काही कलाकारांना ही सूवर्ण संधीच मिळाली आहे. सोशल मीडियावर तर कलाकारांच्या विविध व्हिडिओज, फोटोजनी धुमाकूळ घातला आहे. घरी राहा, सुरक्षित राहा, सोशल डिस्टंसिंगच पालन करा असे आवाहनही कलाकार मंडळी करत आहेत. देशावर ओढावलेल्या या कोरोना संकटात सतत एक अडचण निर्माण होत आहे ते म्हणजे मास्कचा तुटवडा. पण अभिनेत्री सनी लिओनीने एक आयडीयाची कल्पना शोधून काढली आहे. 

मोठी बातमी - कोरोनाच्या लढ्यात उद्धव-राज 'साथ-साथ" 

सनीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घरच्या घरी मास्क तयार केलेल फोटो शेअर केले आहे. तिचे हे फोटो आणि मास्क तयार करण्याची पद्धत नेटकऱ्यांच्याही चांगलीच पसंतीस पडली आहे. घरातच उपलब्ध असलेल्या वस्तुंपासून हे मास्क कसे तयार करायचे हे सनीने सांगितले आहे. घरातील मुलांचे डायपर, मच्छरदानी, कार्टुनच्या आकाराचे मास्क यांपासून आपण आपला कोरोनापासून बचाव करु शकतो.

सनीने एका फोटोमध्ये डायपरपासून मास्क बनवला आहे. तो मास्क तिने स्वतः घालत फोटो शेअर केला आहे. तसेच ग्लब्स घरी उपलब्ध नसेल तर त्याचाही उपाय सनीने शोधून काढला आहे. 

मोठी बातमी - 'ते' सात आठवडे ज्यानी बदललं संपूर्ण जग; जाणून घ्या कोरोनाचा संपूर्ण प्रवास...

घरातील बॉक्सिंग ग्लब्स उपयोग आपण या काळात करु शकतो हे सनीने दाखवून दिले आहे. तसेच घरच्या घरी मच्छरदानीचा वापर करुन सुरक्षित राहण्याचा सोपा उपायही सनीने सांगितला आहे. सनीने बनवलेल्या या साऱ्या गोष्टी आधी तिने परिधान केले आहेत. आणि ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सनीची ही क्रिएटिव्हीटी पाहून चाहतेही तिचे भरभरुन कौतुक करत आहेत. नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसणाऱ्या सनीचा हा नवा अवतार साऱ्यांच्याच पसंतीस पडत आहे.

sunny leone teaching how to make covid 19 mask check video