
मराठा आरक्षणासाठी गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करत आहेत. आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनात पहिल्या दिवशी काही आमदार आणि खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. तर दुसऱ्या दिवशी शिंदे समितीनं भेट घेऊन चर्चेचा प्रयत्न केला. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. मनोज जरांगे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी ऱाष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आझाद मैदानाकडे येत होत्या. मात्र त्यांची कार अडवून आंदोलकांनी घेराव घातला. यावेळी आंदोलकांकडून घोषणाबाजीही करण्यात आली.