लाॅकडाऊनमध्येही तब्बल 'इतक्या' गंभीर नाॅन कोविड रुग्णांवर झाली शस्त्रक्रिया; वाचा सविस्तर बातमी.. 

doctors doing operations
doctors doing operations

मुंबई : संपूर्ण देशात सध्या लाॅकडाऊन सुरू आहे. जवळपास प्रत्येक रुग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशातच गंभीर नाॅन कोविड रुग्णांवर उपचार कुठे करायचे? हा प्रश्न असतानाच मुंबईतील पालिकेच्या केईएम रुग्णालयात आपत्कालीन आणि गंभीर रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. 

केईएम रुग्णालयातील न्युरोलाॅजी विभागातील डाॅक्टरांनी सर्व वयोगटातील नाॅन कोविड गंभीर रुग्णांवर गेल्या चार महिन्यात एकूण 66 शस्त्रक्रिया केल्या आहेत. दररोज किमान 2 शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. 

सर्व वयोगटातील म्हणजेच काही दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळापासून ते 70 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांवर गंभीर शस्त्रक्रिया करुन त्यांचा जीव वाचवण्यात आला आहे. यात जवळपास 8 ते 9 बाळांचा समावेश असून बाकी सर्व 14 ते 70 वयोगटातील आहेत. 

केईएममध्ये देशातूनच नाही जगातील अनेक मोठ मोठ्या शहरातून रुग्ण उपचारांसाठी येतात. मात्र, सध्या कोविड ची परिस्थिती असल्यामुळे रुग्ण उपचार घ्यायला यायलाही घाबरतात. कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीने शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. फक्त गंभीर आणि आपत्कालीन परिस्थितीत असणार्या रुग्णांनाच दाखल करुन घेतले जात होते. 

आतापर्यंत केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी अशाच प्रकारच्या गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. त्यात, ब्रेन ट्युमर, डोक्याला लागलेला मार, कॅन्सर, पक्षाघात, स्पाईनच्या समस्या, स्पाॅन्डेलिसीस, मेंदूत रक्ताच्या गुठळ्या, ब्रेन हेमरेज अशा महत्वाच्या आणि गंभीर शस्त्रक्रियांचा समावेश आहे. या शस्त्रक्रियांमध्ये लहान बाळांचा ही समावेश आहे. जन्मतःच मेंदूत रक्तस्राव होणे, कंबरेला गाठ येणे अशा गंभीर स्वरूपाच्या किमान 8 ते 9 शस्त्रक्रिया केल्या गेल्या असल्याचं केईएम रुग्णालयाच्या न्यूरोसर्जन विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक डाॅ. अतुल गोयल यांनी सांगितले आहे.

नाॅन कोविड रुग्णांसाठी वाॅर्डची गरज - 

केईएम रुग्णालयातील अनेक वाॅर्ड हे सध्या कोविड साठी देण्यात आले आहेत. त्यामुळे, जे नाॅन कोविड रुग्ण आहेत त्यांना कुठे ठेवायचं हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, आता हळूहळू सर्जरीचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे, जे रूग्ण बरे झाले आहेत त्यांना डिस्चार्ज करुन आता नाॅन कोविड रुग्णांसाठी वाॅर्डची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे असं ही डाॅ. गोयल यांनी स्पष्ट केले आहे. 

"लाॅकडाऊन आणि कोरोनामुळे रुग्णांची संख्या खूपच कमी झाली होती. पण, आता ही संख्या हळूहळू वाढत आहे. आता ओपीडीत किमान 10 ते 12 रुग्ण दाखल होत आहेत. कोणत्याही गंभीर रुग्णाला परत पाठवलं जात नाही. 4 महिने कोणीच नव्हतं. याआधी 40 ते 50 रुग्ण दररोज येत होते आणि 4 महिन्यात 400 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. 13 जणांची टिम गेल्या 4 महिन्यापासून या विभागात कार्यरत आहेत. संपूर्णपणे मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. खासगी रुग्णालयात याच शस्त्रक्रियांसाठी 5 ते 6 लाख रुपये मोजावे लागतात जे सामान्य रुग्णांना परवडणारे नसतात," असे केईएम रुग्णालयाच्या न्यूरोसर्जन विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक डाॅ. अतुल गोयल यांनी सांगितले आहे. 

"कोविड सोबत इतर आजारांवरच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. फक्त गंभीर आणि आपत्कालीन परिस्थितीत असणार्या रुग्णांची शस्त्रक्रिया आतापर्यंत केल्या गेल्या आहेत. त्यात लहान मुलांचाही समावेश असून अगदी 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींवर शस्त्रक्रिया करुन त्यांना जीवदान दिलं गेलं आहे," असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं आहे. 

 संपादन : अथर्व महांकाळ 

surgeries done on 60 non covid patients during lockdown in mumbai  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com