कोरोनाचा धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण; 104 जणांना देणार ऑक्सिजन थेरपी

कोरोनाचा धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण; 104 जणांना देणार ऑक्सिजन थेरपी

मुंबई, ता. 28 : कोरोनाचा धोका असणाऱ्या मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणात ४ हजार ३१२ ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब, दमा, मधुमेह यासारखे आजार असल्याचे आढळून आले आहेत. यापैकी १०४ नागरिकांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ९५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्याने त्यांना ऑक्सिजन थेरपी देण्यात येत आहे. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ४०० पथके तैनात होती. 

३१ हजार ८७२ घरांमधील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान ४ हजार ३१२ ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब, दमा, मधुमेह यासारखे आजार असल्याचे आढळून आले आहे. तर यापैकी १०४ नागरिकांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ९५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले. याचाच अर्थ 'कोमाॅर्बिड' गटातील सुमारे २.५ टक्के नागरिकांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी आढळून आले आहे. या ज्येष्ठ नागरिकांना ऑक्सिजन थेरपी देण्यासाठी  'नाॅन‌ कोविड' रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार आहे. पालिका, शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील धर्मादाय खाटांचा उपयोग देखील या रुग्णांसाठी करण्यात येणार आहे.

आजाराचा मोठा धोका
या गटातील ज्येष्ठ नागरिकांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी ही ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्यांच्या बाबतीत या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो. ही बाब लक्षात घेऊन अशा व्यक्तींना 'प्राणवायू उपचार पद्धती' देण्याचा निर्णय बृहन्मुंबई पालिकेने गेल्याच आठवड्यात घेतला होता. त्यानुसार ही कार्यवाही आता सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.

survey of thousands of senior citizens done in mumbai 104 will be sent for oxygen therapy

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com