सुशांतच्या बँक अकाऊंटमधल्या ७० कोटींचा असा झाला व्यवहार, वाचा सविस्तर

पूजा विचारे
Sunday, 30 August 2020

सुशांत सिंह राजपूतच्या बँक अकाऊंट संदर्भात मोठा खुलासा झाला आहे. हा खुलासा सुशांतच्या बँक खात्यांच्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्ये झाला आहे. जो मुंबई पोलिसांनी केला आहे. 

मुंबईः  अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय तपास करत आहेत. या प्रकरणी सीबीआय, ईडी आणि एनसीबीनं आपला तपास वेगानं वाढवला आहे. एजन्सी सध्या सुशांतशी संबंधित लोकांची चौकशी करत आहेत. यादरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या बँक अकाऊंट संदर्भात मोठा खुलासा झाला आहे. हा खुलासा सुशांतच्या बँक खात्यांच्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्ये झाला आहे. जो मुंबई पोलिसांनी केला आहे. 

गेल्या ५ वर्षातील सुशांतच्या बँक अकाऊंटचं ऑडिट रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, गेल्या पाच वर्षात सुशांतच्या बँक अकाऊंटमधून ७० कोटी रुपयांचा टर्नओव्हर करण्यात आला आहे. त्यातले काही पैसे खर्च देखील करण्यात आलेत. सुशांतनं कमवलेल्या ७० कोटींपैकी मुंबईत एक फ्लॅट, महागड्या गाड्या, बाईक खरेदी करण्यात ते पैसे खर्च झाले. ग्रांट थॉर्नटन नावाची कंपनीद्वारे करण्यात आलेल्या ऑडिटच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रॉनिक ट्रान्सजॅक्शन झालेलं नाही. 

इतकंच नाही तर, सुशांतनं वेगवेगळ्या बँकांमध्ये ५ ते ७ कोटी रुपयांची एफडी आणि कोट्यवधी रुपयांची म्युच्युअल फंडमध्येही गुंतवणूक केली आहे. सुशांतनं या ५ वर्षात ५ कोटी रुपयांचा टॅक्स देखील भरला आहे. सुशांत सिंह राजपूतनं कोट्यवधी रुपये आपला मॅनेजमेंट, स्टाफ, फिरणे आणि घर खर्चासाठी वापरले आहे. सुशांतनं ३- ४ कोटी रुपये आपल्या घराचं भाडं भरण्यासाठी खर्च केलेत. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बँक खात्यांचं फॉरेन्सिक ऑडिट केलं होतं. 

हेही वाचाः  लोकल नाहीतर मुंबईत लवकरच सुरु होणार 'ही' सेवा, वाचा सविस्तर

रिया आणि तिच्या कुटुंबियांवर सुशांतनं किती पैसे खर्च केले आहेत याचा सध्या ईडीचे अधिकारी तपास करत आहेत. सुशांतनं मोठी रक्कम रिया आणि तिच्या कुटुंबियावर खर्च केल्याचा ईडीला संशय आहे. 

रियाचा आज पुन्हा चौकशी

सीबीआय आज पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. याप्रकरणी सीबीआयनं शनिवारी रिया चक्रवर्तीची खूप तास कसून चौकशी केली. पण सीबीआयला आणखीन काही मुद्द्यांवर माहिती घ्यायची आहे. ज्यासाठीच रियाला सगल तिसऱ्या दिवशी चोकशीसाठी बोलवण्यात येतं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय रियाकडून मिळालेल्या उत्तरांनी समाधानी नाही.

अधिक वाचाः  काँग्रेसच्या आरोपानंतर संदीप सिंहची चौकशी होणार?, गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

गेल्या दोन दिवसांपासून सीबीआय रियाची चौकशी करत आहे. पहिल्या दिवशी, शुक्रवारी, 28 ऑगस्टला सुमारे 10 तास सीबीआयने रियाची चौकशी केली. शनिवारी 29 ऑगस्टला रियाची 7 तास चौकशी करण्यात आली.

Sushant Singh Rajput Case 70 crore rupee turnover bank accounts


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput Case 70 crore rupee turnover bank accounts