लोकल नाहीतर मुंबईत लवकरच सुरु होणार 'ही' सेवा, वाचा सविस्तर

पूजा विचारे
Sunday, 30 August 2020

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येतेय. केंद्राच्या गाइडलाइन्सनुसार पाच महिन्यांनंतर मेट्रो सेवेचे दरवाजे खुले होणारेत. मुंबई, दिल्लीसह देशातील ज्या शहरांत मेट्रोसेवा आहे, त्या सर्व मेट्रो सेवा येत्या ७ सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईः देशासह राज्यात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असा अनलॉकचा चौथा टप्पा असणार आहे. त्यामुळे अनलॉक ४ साठी केंद्र आणि राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्यात. त्यामुळे या गाईडलाईन्समुळे मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येतेय. केंद्राच्या गाइडलाइन्सनुसार पाच महिन्यांनंतर मेट्रो सेवेचे दरवाजे खुले होणारेत. मुंबई, दिल्लीसह देशातील ज्या शहरांत मेट्रोसेवा आहे, त्या सर्व मेट्रो सेवा येत्या ७ सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे मुंबईत घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावणारी मेट्रो सुरू झाल्यावर हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे आणि कार्यालयांचे जाळं आहे. हजारो नोकरदारांसाठी मेट्रो हे प्रवासाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे मेट्रो सेवा सुरु झाल्यास मुंबईतल्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. 

हेही वाचाः  पालिकेकडून लता मंगेशकर यांची इमारत सील,  मंगेशकर कुटुंबियांकडून निवेदन सादर

अनलॉक चारमध्ये मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा पूर्ववत होईल, अशी मुंबईकरांना अपेक्षा होती. मात्र केंद्रानं जाहीर केलेल्या गाईडलाईन्समध्ये लोकल सेवेबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचं, स्पष्ट झालं आहे. याआधी मध्य रेल्वेनं लोकल सेवेबाबत आपली भूमिका जाहीर केली होती. राज्य सरकारने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केल्यास आणि रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिल्यास लोकल सुरू करण्यास आम्ही तयार आहोत, असं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं होतं.

अधिक वाचाः  मुंबईत पावसाचा जोर ओसरणार; पण ठाणे, रायगड पालघरमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज
 

नव्या गाईडलाईन्समध्ये काय आहे? 

  • नव्या गाइडलाइन्सनुसार सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंज, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि इतर कार्यक्रमांना २१ सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. या कार्यक्रमांना १०० जणांपर्यंतच्या उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.
  • शाळा, कॉलेज, कोचिंग सेंटर आणि शैक्षणिक संस्थानं उघडण्यास अनलॉक-४ मध्येही परवानगी नसेल. त्यामुळे तूर्त ऑनलाइन शिक्षण हाच पर्याय असणार आहे. सर्वच संस्थांना त्यानुसार नियोजन करावे लागणार आहे.
  • कंटेन्मेंट झोन वगळता राज्य आणि केंद्र शासित प्रदेश स्थानिक पातळीवर केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय आता कुठेही (राज्य, जिल्हा, विभाग, शहरं आणि गावं) लॉकडाऊन घोषित करता येणार नाही, असं केंद्रानं दिलेल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.
  • अनलॉक-४ मध्येही शाळा, कॉलेज, कोचिंग सेंटर आणि शैक्षणिक संस्था बंदच राहतील. त्यामुळे ऑनलाइन आणि डिस्टन्स शिक्षण हाच पर्याय असेल. 
  • कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी होणार आहे. राज्यात सर्वाधिक कंटेन्मेंट झोन असून या झोनमध्ये असणाऱ्या नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही सवलत मिळणार नाही.
  • २१ सप्टेंबरपासून खुल्या चित्रपटगृहांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर बंदिस्त सिनेमागृह बंदच राहणार आहेत. 
  • Unlock 4 guidelines Mumbai Metro Service will start from 7 september


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unlock 4 guidelines Mumbai Metro Service will start from 7 september