सुशांत सिंग राजपूत आत्महत्या केस, आज मुंबई पोलिसांकडून आली 'ही' अपडेट... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी बधुवारी कास्टींग डायरेक्टरचा जबाब नोंदवण्यात आला.

मुंबई - सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी बधुवारी कास्टींग डायरेक्टरचा जबाब नोंदवण्यात आला. लवकरच याप्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीकडून याप्रकरणाबाबत माहिती घेण्यात येणार आहे. आतापर्यंत याप्रकरणी 10 जणांचा जबाब नोंदवण्यात आला.

सुशांत सिंगप्रकरणी पोलिसांनी बुधवारी कास्टींग डायरेक्टरचा जबाब नोंदवला. त्यात त्याने सुशांतच्या तणावाबाबत माहिती नसल्याचे सांगितले. तो चांगला अभिनेता होता वगैरे अशा गोष्टी त्याने पोलिसांना सांगितल्या आहेत. आता याप्रकरणी सुशांतची जवळची मैत्रीण रियाचाही जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

BIG NEWS - मुंबईतील धारावी पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार...

पोलिसांनी मंगळवारी सुशांतचे वडील आणि दोन बहिणींचा जबाब नोंदवला. त्यात सुशांत अधूनमधून तणावाबाबत बोलायला, मात्र त्याचे नेमके कारण त्याने सांगितले नसल्याचे वडिलांनी सांगितले. तसेच कुटुंबाने कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. याप्रकरणी आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे.

ज्या दिवशी सुशांतने आत्महत्या केली त्या दिवसाच्या दिनक्रमानुसार सहा जणांकडून माहिती घेण्यात आली होती.  रविवारी सकाळी सुशांत सकाळी साडे सहा  वाजता उठला. 9 वाजता त्याने ज्यूस पिऊन साडे नऊच्या सुमारास बहिणीला दूरध्वनी केला होता. साडे दहाच्या सुमारास  सुशांत पून्हा त्याच्या खोलीत गेला. तो बाहेर आलाच नाही. 11 च्या सुमारास त्याच्या नोकराने त्याला  पून्हा जेवणासाठी विचारले. मात्र त्याच्या खोलीतून कोणतेही प्रतिउत्तर आले नाही. 12 वाजले तरी सुशांत रुम बाहेर न आल्याने पून्हा नोकर त्याला उठवायला गेला. मात्र तरी सुशांत खोलीतून कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे नोकराने सुशांतसोबत राहणारा त्याचा मित्र सिद्धार्थ याला सांगितले.

BIG NEWS - वैद्यकीय परिक्षा रद्द करा; अन्यथा आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता... वाचा सविस्तर...

सिद्धार्थ हा आर्टीस्ट आहे. त्याने सुशांतला फोन केले मात्र सुशांत फोन ही घेत नव्हता. मग सिद्धार्थने त्याच्या गोरेगाव येथे राहणाऱ्या बहिणीला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याने चावीवाल्याला बोलावले. चावीवाल्याने बनावट चावीने दरवाजा उघडल्यानंतर सुशांतने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात सुशांतची बहिण, 2 मॅनेजर, स्वयंपाकी, चावीवाला आणि त्याचा जवळचा मित्र महेश शेट्टी याच्याशी बोलून पोलिसांनी सर्व घटनाक्रम समजावून घेतला आहे. पण त्यात कोणतीही ठोस माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

sushant singh rajput case mumbai police shares this information about investigation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput case mumbai police shares this information about investigation