esakal | सुशांतसिंह राजपूत प्रकरण : दिवसभरात काय घडलं वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

sushant rhea

सुशांतच्या आत्महत्येनंतर मृतदेह आणणाऱ्या अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरचा जबाब घेण्यात आला होता. त्यानंतर अटेंडंटचा जबाबही समोर आला आहे. सुशांतच्या रूममध्ये तो गेला तेव्हा मृतदेह कशा अवस्थेत होता याची माहिती त्याने दिली आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरण : दिवसभरात काय घडलं वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक आरोप केले असून त्यामध्ये रियानं सुशांतकडून 15 कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात राजकारण केलं जात असल्याचं रियाने म्हटलं. दुसरीकडे ईडीकडून पहिल्या टप्प्यात रियाची नऊ तास कसून चौकशी झाल्यानंतरही आज, रिया चक्रवर्तीची पुन्हा चौकशी करण्यात येत आहे. 

मिडिया ट्रायल विरोधात रिया सर्वोच्च न्यायालयात
रियाविरोधात बिहारमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसंच सुशांत सिंग राजपूत प्रकरणी माध्यमांतून दिवसभर सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या बातम्या प्रसारीत केल्या जात आहेत. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांतच्या आत्महत्येचं भांडवल केलं जात असल्याचं म्हणत रियाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सविस्तर बातमी

संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करणार
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणी अनेक दावे करण्यात आले आहेत. संजय राऊत यांनी या प्रकरणात म्हटलं होतं की सुशांतचे वडिल के के सिंह यांच्या दुस-या लग्नामुळे दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते. तसंच संजय राऊत यांनी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचा सुद्धा या प्रकऱणात उल्लेख केला आहे. यानंतर सुशांतचा चुलत भाऊ नीरजने संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचं सांगितलं आहे. सविस्तर बातमी

सुशांतचा मृतदेह कोणत्या अवस्थेत होता?
सुशांतच्या आत्महत्येनंतर मृतदेह आणणाऱ्या अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरचा जबाब घेण्यात आला होता. त्यानंतर अटेंडंटचा जबाबही समोर आला आहे. पोलिसांच्या दबावामुळे सर्व सांगू शकत नाही असं त्याने म्हटलं आहे. मात्र जेव्हा सुशांतच्या रूममध्ये तो गेला तेव्हा मृतदेह कशा अवस्थेत होता याची माहिती त्याने दिली आहे. सविस्तर बातमी

सुशांतचे वडील आणि बहिणीकडे सीबीआय चौकशी
दरम्यान, आता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि ईडीकडून केली जात आहे. या प्रकरणी दोन्ही एजन्सीची पथके सुशांतचे वडील आणि बहिणीकडे चौकशी करण्याची शक्यता आहे. फरीदाबादचे पोलिस कमिश्नर ओपी सिंग यांच्या घरी दोन्ही टीम या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोहचतील. याठिकाणी पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ओपी सिंह यांची पत्नी सुशांतची बहीण असून सुशांतचे वडील सध्या त्यांच्याकडेच राहतात. त्यामुळे ईडी आणि सीबीआय इथेच दोघांकडे चौकशी करणार आहे. 

ईडी आता निर्माता संदीप सिंहची चौकशी करण्याची शक्यता

ईडीने आत्तापर्यंत रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, वडिल इंद्रजीत आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर असलेली श्रुती मोदी यांची चौकशी केली आहे. नुकत्याच मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार ईडी निर्माता संदीप सिंहची देखील चौकशी करण्याची शक्यता आहे. ईडीला असं कळालं आहे की सुशांत आणि संदीप सिंह यांच्या बँक अकाऊंटमध्ये काही व्यवहार झाले आहेत. संदीर स्वतःला सुशांतचा चांगला मित्र म्हणवतो आणि सुशांतच्या अंतिम संस्काराच्या वेळी देखील तो हजर होता.

दिशाच्या मृत्यूचाही सीबीआय तपास करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका 
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत असतानाच आता त्याची मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यूचा तपासही सीबीआयकडे सुपूर्द करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सुशांतच्या मृत्यूच्या सहा दिवसांपूर्वीच दिशाचा चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या तपासाच्या फाईल्सही न्यायालयात दाखल कराव्यात, अशी मागणीदेखील याचिकेत करण्यात आली आहे.