esakal | सुशांतचा गूढ मृत्यू ते सीबीआय तपास;  14 जुलैपासून आतापर्यंत काय घडलं?
sakal

बोलून बातमी शोधा

rhea chakrvourty

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली जात होती. त्यावरून झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला.

सुशांतचा गूढ मृत्यू ते सीबीआय तपास;  14 जुलैपासून आतापर्यंत काय घडलं?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कोणी करायचा, असा पेच निर्माण झाला होता. त्याची सूत्रे सर्वोच्च न्यायालयाने ‘सीबीआय'कडे सोपवल्याने वादाला पूर्णविराम मिळाला. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान, सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली जात होती. त्यावरून झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला. मात्र तपास सीबीआयकडे सोपवताना मुंबई पोलिसांकडून तपासात कोणतीही चूक झाली नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं आहे. 

जून 
१४ - मुंबईत बांद्रा भागातील अपार्टमेंटमध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा छताला लटकलेला मृतदेह आढळला. फौजदारी दंडसंहितेनुसार मुंबई पोलिसांकडून तपास सुरू. 
१८ – सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. 

हे वाचा - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिस समांतर तपास करणार ? अनिल देशमुख म्हणालेत...

जुलै 
६ - चित्रपट दिग्दर्शक संजय लिला भन्साळींचा जबाब. 
१८ - ‘यशराज फिल्मस'चे अध्यक्ष आदित्य चोप्रा यांचा जबाब. 
२५- रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध सुशांत यांचे वडील के. के. सिंह यांनी पाटण्यात तक्रार नोंदवली. पाटणा पोलिसांनी रिया आणि इतरांनी सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रूपये काढल्याची तक्रारही नोंदवली. तक्रारीत रिया व तिच्या नातेवाइकांनी सुशांतला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. 
२७ - मुंबईत दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब. 
२९- रियाची सर्वोच्च न्यायालयात धाव. पाटणा येथील तक्रार मुंबईत वर्ग करावी, अशी मागणी. 

हे वाचा - ...तर CBI च्या पथकाला क्वारंटाईन व्हावे लागेल; BMC ने स्पष्ट केली भूमिका

ऑगस्ट 
३ – सुशांत यांच्या वडिलांचा इशारा देणारा जुना व्हिडिओ सादर. कारवाईची विनंती करूनही पोलिसांनी ४० दिवस काहीच केले नाही, असेही ते म्हणाले. 
४ – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडून सीबीआय चौकशीची मागणी. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी ५४ जणांचे जबाब नोंदवल्याचे स्पष्ट केले. 
६ – ‘सीबीआय'ने या प्रकरणात प्रथम माहिती अहवाल दाखल केल्याचे सांगितले. 
७ – रियाच्या विनंती अर्ज प्रकरणात आपल्यालादेखील सहभागी करून घेण्याची केंद्राची न्यायालयात मागणी. रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तींची ईडी कार्यालयात हजेरी. 
८ – सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह यांनी रियाच्या अर्जाला सर्वोच्च न्यायालयात विरोध केला. 
१०– ‘मिडिया ट्रायल'बाबत रियाने सर्वोच्च न्यायालयात नव्याने अर्ज केला. 
११– सुशांतचे प्रकरण बिहार पोलिसांच्या कार्यकक्षेबाहेरचे असल्याचा महाराष्ट्र सरकारचा दावा.बिहार पोलिसांच्या तपासात पूर्वग्रहदुषित तपासाची शक्यता रियाकडून व्यक्त. 
१९ – सीबीआयकडे पाटणातील प्रथम माहिती अहवाल वर्ग करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता. आता प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीबीआयकडे. 

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)