Swapnagandha Apartment : विरारमध्ये 18 सदनिकांची 42 ग्राहकांना विक्री

स्वप्नगंधा अपार्टमेंट` वाय. के. नगरमध्ये ग्राहकांना पावणेदहा कोटी रुपयांचा चुना
Swapnagandha Apartment
Swapnagandha Apartmentesakal
Updated on

विरार : मौजे बोळींज वाय. के. नगरमधील नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘स्वप्नगंधा अपार्टमेंट`मधील 18 सदनिका तब्बल 42 ग्राहकांना विक्री करून विकासकांनी ग्राहकांना पावणेदहा कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फिर्यादी अबेल मायकल डिमेलो यांच्या तक्रारीनंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात विकासक हेमंत जगन्नाथ पाटील व जयेंद्र कमलाकर पाटील यांच्याविरोधात 406, 420, 120ब या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पांडुरंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश पुरभे करत आहेत.

Swapnagandha Apartment
Nagpur News : दीक्षाभूमीला पोलिसांचा वेढा

मौजे बोळींज विरार पश्चिम येथील सर्व्हे क्रमांक 347/05 ही जमीन जगदीश आंबो भोईर व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर होती. या जागेचा विकास करण्यासाठी विरार पश्चिम येथील विकासक हेमंत जगन्नाथ पाटील व जयेंद्र कमलाकर पाटील यांनी सन 2011 साली त्यांच्याशी विकसन करारनामा केला होता. वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून बांधकाम परवानगी मिळवून विकासकांनी या जागेवर ‘स्वप्नगंधा अपार्टमेंट` या नावाने सात मजल्याच्या दोन इमारती मिळून एकूण 84 रहिवासी सदनिकांचे बांधकाम केले होते. मात्र या इमारतीतील सदनिकांची विक्री करताना विकासक हेमंत पाटील व जयेंद्र पाटील यांनी या इमारतीतील 18 सदनिकांची 42 वेगवेगळ्या ग्राहकांना विक्री करून ग्राहकांना तब्बल पावणेदहा कोटी रुपयांचा चुना लावला आहे.

Swapnagandha Apartment
Nashik Crime News : 10 हजारांसाठी दिले कोयत्याने ठार मारण्याची धमकी!

स्वप्नगंधा अपार्टमेंट इमारत क्रमांक दोन या इमारतीतील 101 क्रमांकाची सदनिका विकासक हेमंत पाटील व जयेंद्र पाटील यांनी शकुंतला जगदीश भोईर, निर्मल जोसेफ वसईकर, प्रतीक लक्ष्मीनारायण पांडे, प्रभाकर गोविंद हरेर अशा चार वेगवेगळ्या ग्राहकांना विकलेली आहे. तर दुसऱ्या मजल्यावरील 205 क्रमांकाची सदनिका शकुंतला जगदीश भोईर, अबेल मायकेल डीमेलो व चंदू रावल अशा तीन वेगवेगळ्या ग्राहकांना विकल्याचे आणि याच मजल्यावरील 206 क्रमांकाची सदनिका शकुंतला जगदीश भोईर, वेल कुमार थंगवेलु, निर्मल जोसेफ वसईकर अशा तीन वेगवेगळ्या ग्राहकांना विकल्याचे निदर्शनास आले आहे. तिसऱ्या मजल्यावरील 305 क्रमांकाची सदनिका हेमंत पाटील यांनी प्रकाश चंद्र सोनी, मनोज कुमार पांडे व योगेश कुंदन सुतार अशा तीन वेगवेगळ्या ग्राहकांना विकलेली आहे. याव्यतिरिक्त याच इमारतीतील 402, 506, 601, 606, 702, 703, 705 आणि 706 या क्रमांकाच्या सदनिका दोन वेगवेगळ्या ग्राहकांना विकल्याचे दिसून येत आहे. फिर्यादी अबेल मायकल डिमेलो यांच्या तक्रारीनंतर अर्नाळा सागरी पोलीस स्टेशन येथे विकासक हेमंत जगन्नाथ पाटील व जयेंद्र कमलाकर पाटील यांच्यावर 406, 420, 120ब या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Swapnagandha Apartment
Nashik Abduction News : युवतीचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न! देवळाली कॅम्पातील घटना

दरम्यान; आरोपींवर एमपीआयडी कायद्याखाली गुन्हा नोंदवून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी फिर्यादीनी केली आहे. या गुन्ह्यात फसवणुकीची रक्कम तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची त्यांची मागणी आहे. तसेच या प्रकरणात बोगस व बनावट कागदपत्रांचा वापर करून सदनिकांची नोंदणी झालेली असल्याने फोर्जरीची इतर कलमे वाढण्याची शक्यता आहे.

जेठवा आणि डिमेलो या फिर्यादींच्या तक्रारीनंतर ‘स्वप्नगंधा अपार्टमेंट`मधील फसवणूक प्रकरणात हेमंत जगन्नाथ पाटील व जयेंद्र कमलाकर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर याच इमारतीशेजारील ‘चैतन्य अपार्टमेंट`मधील फसवणुकी प्रकरणात नॅनड्रिना गोन्साल्विस यांच्या तक्रारीनंतर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे. संबंधित विकासकांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे. परंतु गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता त्यांना जामीन मिळू नये, याकरता प्रयत्न करण्यात येतील. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी त्यासाठी जास्तीत जास्त तक्रारी करणे अपेक्षित आहे.

-विजय पाटील, पोलीस निरीक्षक, अर्नाळा पोलीस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com