स्वीट चार्ली तुमच्या भेटीला! ..'हे' तिचे आरोग्यदायी फायदे

स्वीट चार्ली तुमच्या भेटीला! ..'हे' तिचे आरोग्यदायी फायदे
स्वीट चार्ली तुमच्या भेटीला! ..'हे' तिचे आरोग्यदायी फायदे

नवी मुंबई : यंदा सोलापूरवरून येणारी नवीन पपईची जात बाजारात दाखल झाली आहे. स्वीट चार्ली असे या पपईच्या प्रजातीचे नाव आहे. चवीबरोबर दरही आवाक्‍यात असल्याने, या पपईला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या पपईमुळे चांगलेच आरोग्यदायी फायदे असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. 

पपई हे पिवळ्या व लालसर रंगाचे गोड चवीचे फळ आहे. हे फळ पचनास मदत करते. त्याच्या बिया व गर आरोग्यदायी आहे. रोजच्या जेवणात सॅलाड म्हणून याचा उपयोग केला जातो. सध्या बाजारात उस्मानाबादवरून येणाऱ्या पपईची आवक सुरू आहे. याशिवाय तैवान 786, 785 या प्रकारच्या पपई बाजारात उपलब्ध आहेत. घाऊक बाजरात 10-12 किलो या दराने ही पपई उपलब्ध आहे; तर किरकोळ दर प्रति नग 30 रुपये असे आहेत, परंतु सोलापूरच्या स्वीट चार्ली या नव्याने बाजारात दाखल झालेल्या प्रकाराला सध्या ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चवीला गोड, दिसायला आकर्षक व टिकाऊ या वैशिष्ट्यांमुळे ही पपई ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. या पपईची रोज 25 गाडी आवक होत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

आरोग्यदायी फायदे-
1. पोटाचे विकार दूर करण्यासाठी पपई लाभदायी आहे. पचनसंस्था सुरळीत करण्याचे काम यामुळे होते.
2. उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी पपईच्या पानांची भाजी करतात.
3. पपईमुळे त्वचेचे रोग दूर होतात.
4. दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते.
5. खरूज आणि गजकर्णावर पपईचा चीक लावला जातो.
 

स्वीट चार्ली ही पपईची प्रजात चवीला गोड, दिसायला आकर्षक व टिकाऊ आहे. तिची रोज 25 गाडी आवक होत आहे. ही पपई घाऊक प्रतिकिलो 22 रु. दरात; तर किरकोळ बाजारात प्रतिनग 50-55 रु. दरात उपलब्ध आहे. 
- भरत देवकर, व्यापारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com