esakal | पोलिसांवर कारवाई करा : फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadanvis

पोलिसांवर कारवाई करा : फडणवीस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या या अरेरावीचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी केली.

हेही वाचा: नॅशनल पार्क मधील 'मास्टर झोनल प्लॅन' कागदावर

ते म्हणाले, की पत्रकार त्यांचे काम करत असतात. शिवाय लालबागमध्ये गेलेल्या पत्रकारांकडे अधिकृत पास होते. सर्व नियमांचे पालन करून ते काम करत होते. हा प्रकार जिथे घडला तिथे गर्दीदेखील नव्हती. असे असतानाही त्यांच्यावर दादागिरी करण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली, हे निषेधार्हच असून. संबंधित पोलिसांवर आधी कारवाई झाली पाहिजे आणि नंतर चौकशी करावी,अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा: तारापूर स्फोटातील कारखाना मालकांवर गुन्हे दाखल करा : खासदार राजेंद्र गावित

ते म्हणाले, की तो व्हिडिओ मी स्वत: पाहिला. ‘हात काय, पायही तोडू’ अशी धमकी पोलीस अधिकारी पत्रकारांना देताना दिसत आहेत. हे वर्तन अत्यंत चुकीचे आहे. तिथे गर्दी झाली होती, असेही नाही. त्यामुळे इतकी दंडुकेशाही योग्य नाही. ह्या दंडुकेशाहीच्या जोरावर कुणी कायदा-सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असेल तर योग्य नाही.

"गेल्या दोन वर्षांमध्ये माध्यमांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. कधी गुन्हे दाखल करायचे, कधी अटक करायची तर कधी आणखी काही कारवाई करायची. एक प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय."

- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

loading image
go to top