esakal | बिबट्यापासून संरक्षणासाठी पावले उचला : रवींद्र वायकर Shivsena Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बिबट्यापासून संरक्षणासाठी पावले उचला : रवींद्र वायकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जोगेश्वरी : आरे (Aarey) कॉलनीतील मानवी वस्तीवरील बिबट्याचा वाढता वावर, तसेच हल्ल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या हल्ल्यापासून येथील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पावले उचलावीत, अशी सूचना जोगेश्वरी (Jogeshwari) विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) यांनी वनविभागाला दिल्या.

आमदार रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली आरे पोलिस ठाणे येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगरसेविका रेखा रामवंशी, पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे, आरे प्रशासनाचे मुख्याधिकारी राजेंद्र राऊत, वनविभागाचे अधिकारी रामेश्वरी बोंगाळे, दिनेश देसले, आरे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती देसाई, मनपाच्या घनकचरा विभागाचे अधिकारी संदीप मयेकर, अदानी इलेक्ट्रिक कंपनीचे महाव्यवस्थापक सुनील दळवी आदी उपस्थित होते. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची वायकर यांनी माहिती घेतली.

हेही वाचा: अक्षय निकाळजे म्हणतात, तो आमदार कांदेंचा ‘पब्लिसिटी स्टंट’

मानवीवस्तीलगत पडलेला कचरा तत्काळ उचलण्यासाठी तसेच घराजवळील वाढलेली झुडपे काढण्यासाठी मुंबई महापालिकेने साह्य करावे, अशी सूचनाही वायकर यांनी या वेळी मनपाचे सहायक आयुक्त यांना केली. त्यानुसार याकामी तत्काळ मदत करण्याचे आश्वासन सहायक आयुक्त घोंडे यांनी या वेळी दिले.

loading image
go to top