esakal | रात्रीच्या सुमारास श्वास घेणे झाले कठीण; खारघर, कामोठ्यात वायू प्रदूषण | Air pollution
sakal

बोलून बातमी शोधा

Air Pollution

रात्रीच्या सुमारास श्वास घेणे झाले कठीण; खारघर, कामोठ्यात वायू प्रदूषण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : तळोजा औद्योगिक वसाहतींमधून (Taloja industrial society) रात्रीच्या वेळेस विषारी वायु (toxic Air) सोडले जात असल्यामुळे खारघर, कामोठे आणि तळोजा परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळेस या कंपन्यांच्या धुरांड्यांतून (company pollution) सोडणारा धूर वर न जाता हवेतच राहत असल्यामुळे खारघर शहरात रात्रीच्या वेळेस ११ नंतर फिरताना उग्र दर्प जाणवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून (people complaints) करण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी मौन बाळगले आहे.

हेही वाचा: 'आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात'

नवी मुंबईत दरवर्षी सणासुदीच्या काळात वायु प्रदूषणाची नोंद होत असते. दरवर्षी दिवाळीत फटाके फोडण्याचे प्रमाणामुळे हवेचा दर्जा घसरतो. परंतु कोविडमुळे गेले दोन वर्षे सणांवर संक्रात निर्माण झाल्याने प्रदूषणाची पातळी खाली आहे. परंतु याआधी फटाक्यांच्या धुराच्या वासात कंपन्यांमधून सोडण्यात येणारे विषारी वायु झाकले जात असत. पण आता कसल्याच प्रकारची फटाके फोडले नसतानाही रात्री १० नंतर खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली भागात घाणेरडा वास येण्यास सुरुवात होते. रात्री ११ नंतर हा वास इतका उग्र होत जातो की रात्रीच्या सुमारात खिडकी उघडी करून थंड हवा घरात घेण्याची सोय राहत नाही.

हेही वाचा: बेलापूर रेल्वे स्थानकात ज्येष्ठ नागरिकाला गंडा

या परिस्थितीत कंपन्यांमधून सोडणारे वायु वातवरणातील धुक्यात मिश्रित होत असल्याने धुरके तयार होत आहेत. रात्रीच्या वेळस कामावरून घरी परतणाऱ्या अनेक नागरीकांना खारघर, तळोजा आणि कामोठे परिसरात हे दिसून येत आहे. ११ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारा खारघर मधील सेंट्रल पार्क, सेक्टर ३० ते ३६, तळोजा गाव, कामोठे या भागात मोठ्या प्रमाणात उग्र दर्प आणि धुरके दिसून आले. गा दर्प अगदी पहाटे धावायला जाणाऱ्या नागरीकांनी सकाळी ७ वाजेपर्यंत जाणवत असतो. तसेच त्वचेवर तेलकट सारखे तवंग तयार होतात. पातळ कागदाने त्वचा स्वच्छ केल्यास काळ्या रंगाचे डाग नागरीकांना कपड्यावर दिसून येत आहेत. या बाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे नवी मुंबईचे प्रादेशिक अधिकारी डी.बी.पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशा प्रकारे तपास करणारे दुसऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले.

loading image
go to top