
मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं जुहू बीचवर मोठ्या प्रमाणात कचरा पसरला आहे.
VIDEO : मुंबईत धुवांधार, जुहू बीचवर दिसून आले डांबराचे गोळे
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department, IMD) राज्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर, राज्यातील इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरुये.
मुंबई (Mumbai), ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि विदर्भातही पावसानं थैमान घातलंय. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळं (Heavy Rainfall) पूरस्थितीत निर्माण झालीय. तर, अनेक ठिकाणी वीज पडून लोकांना आपला जीवही गमवावा लागलाय. आतापर्यंत राज्यात एकूण ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पूरस्थिती हाताळण्यासाठी राज्यात १५ एनडीआरएफच्या (NDRF) टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणाला मुसळधार पावसाचा तडाखा; 128 गावांचा संपर्क तुटला
दरम्यान, मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं जुहू बीचवर मोठ्या प्रमाणात कचरा पसरला असून बीचवर वाहत आलेले डांबराचे गोळे देखील पहायला मिळत आहेत. या डांबर गोळ्यांमुळं पाणी दुषित होण्याचं प्रमाण अधिक वाढणार आहे. याचा जलचरांना देखील मोठा फटका बसणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जुहू बीचवर असे डांबराचे गोळे आपल्या आढळतात. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाहीय. सध्या मुंबईत धुवांधार पाऊस सुरु असून रस्त्याच्या मधोमध कचरा साचला आहे. समुद्र किनाऱ्यावर काळ्या किंवा गडद तपकिरी रंगाचा चिकट द्रव (डांबर) साचून राहत आहे. किनाऱ्यावर वाहून आलेल्या डांबरानं सागरी जीव आणि किनार्यावरील समुदायांच्या जीवनाचा नाश केलाय.
Web Title: Tar Balls With Garbage Wash Ashore The Coast Of Juhu Beach In Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..