विद्यार्थ्यांसाठी धावून आला शिक्षक, दुचाकीला मारली किक आणि थेट गाठली ११०० किलोमीटरवरील मुंबई...

विद्यार्थ्यांसाठी धावून आला शिक्षक, दुचाकीला मारली किक आणि थेट गाठली ११०० किलोमीटरवरील मुंबई...

मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर लगेच राज्य सरकारनं लॉकडाऊन लागू केला होता. यात अनेक लोकांचे रोजगार गेले तर काही लोकांना कामावरून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे जो तो आपल्या मूळगावी जाण्यासाठी खटपट करत होता. काही जण लॉकडाऊन सुरु होताच आपल्या गावी गेले. मात्र आता सरकारनं हळूहळू लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या भीतीनं गावी गेलेले अनेक लोकं पुन्हा कामावर येण्यास नकार देत आहेत. मात्र कर्तव्य बजावणं म्हणजे नक्की काय हे एका शिक्षकानं दाखवून दिलं आहे. 

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे बहुतांश जण मुंबई सोडून आपल्या मूळगावी गेले आहेत. आता कार्यालयं, दुकानं किंवा शाळा इत्यादी गोष्टी सुरु होणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना परत बोलवण्यात येत आहे. म्हणूनच एका शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी तब्बल ११०० किलोमीटरचा प्रवास दुचाकीनं केलाय. या शिक्षकानं गोंदिया ते मुंबई असा ११०० किमीचा प्रवास तब्बल ३ दिवसात पूर्ण केलाय. 

देवेंद्रकुमार नंदेश्वर असे या शिक्षकाचं नाव आहे. लॉकडाऊन नंतर सर्व शाळा बंद झाल्या. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नंदेश्वर कुटुंबासह गावी गेले. मात्र त्यानंतर ऑनलाईन शिक्षण आणि अनेक शाळांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची सोय केल्यामुळे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. अनेक शिक्षकांनी या निर्णयाला विरोध दर्शविला होता. मात्र नंदेश्वर ३ मे ला गावाहून मुंबईला येण्याची इतर सोय नसल्यामुळे आपली दुचाकी घेऊन निघाले आणि ५ मे ला कामावर रुजू झाले. 

"मला कामावर रुजू होण्याचे निर्देश मिळाले आहेत, मग ते कर्तव्य विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचं असो किंवा कोरोनाच्या ड्युटीचं असो. ते निष्ठेनं पार पाडायचं," असं नंदेश्वर यांनी म्हंटलंय.

teacher travel 1100 kms by his two wheeler to mumbai read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com