शिक्षकांचा आमदार शिक्षकच करायचा - शिवाजी निरगुडे

विजय पगारे
मंगळवार, 5 जून 2018

इगतपुरी - धनशक्ती विरोधात शिक्षक जनशक्ती असे वातावरण ह्यावेळी या शिक्षक मतदार संघात पाहवयास मिळते आहे. भाऊसाहेब कचरे पाटील हे सामान्य शिक्षक असल्यामुळे व शिक्षकांच्या प्रश्नाची जाणीव असल्याने जिल्ह्यातील सर्वच मुख्याध्यापक व शिक्षक भाऊसाहेब कचरे पटलांच्या मागे उभे आहेत. यावेळी मात्र बोलून जरी दाखवत नसले, तरी करुन मात्र नक्कीच दाखवणार आहोत. यावेळी 'सौ सोनार की अन् एक लोहार की' अशी किमया शिक्षक मतदार करून दाखवणार आहेत. असे प्रतिपादन टीडीएफचे जेष्ठ नेते शिवाजी निरगुडे यांनी आज केले. 

इगतपुरी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित राहून शिवाजी निरगुडे यांचे अध्यक्षतेखाली शिक्षकांचा भव्य मेळावा झाला. यावेळी 300 ते 350 शिक्षक उपस्थित होते. यात टी. डी. एफ.चे जेष्ठ नेते व एम. व्ही. पी.चे माजी शिक्षणाधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी, मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह एस. बी. देशमुख, टीडीएफचे नेते नानासाहेब देवरे, बी आर पाटील, एन. डी. एस. टी.चे संचालक बाळासाहेब ढोबळे, एम व्ही बच्छाव, संचालिका विजया देवरे किशोर पालखेडकर, एस .ए.पाटील, भाऊसाहेब शिरसाठ, जीभाऊ शिंदे बाबासाहेब खरोटे, मनोज वाकचैरे, डी. एम. केदारे, डी. बी. म्हस्कार डी. एस. ठाकरे, आर. एस. गायकवाड, आर. ऐन. बोरसे, भागवत आरोटे, गुळवे, बी .एस जाधव व आदी उपस्थित होते 

या मेळाव्यास शिक्षकांसह शिक्षिका भगिनी मोठ्या प्रमाणात हजर होत्या. एकच ध्येय भाउसाहेब कचरे पाटील हे टी. डि. एफ.चे अधिकृत उमेदवार असून, त्यांना शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेमध्ये पाठविण्याचा एकच निर्धार करण्यात आला. या मेळाव्याचे नियोजन बाळासाहेब ढोबळे संचालक व इतर इगतपुरी तालुक्यातील प्रतिनिधीनी केले होते.

Web Title: teachers MLA has to be teacher - Shivaji Nirgunda