

Team Omie Kalani alliance with Shinde Shivsena
ESakal
उल्हासनगर : शहराच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी चर्चा सध्या रंगली आहे. टीम ओमी कलानीचा थेट शिवसेना (शिंदे गट)मध्ये विलय होणार का? आणि कलानी गटाचे उमेदवार शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या अधिकृत चिन्हावरच निवडणूक लढवणार का? या प्रश्नांनी १५ जानेवारीला होणाऱ्या उल्हासनगर महापालिका निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीतील अंतर्गत गणिते, भाजपची ठाम भूमिका आणि स्थानिक पक्षांची कोंडी यामुळे शहरातील सत्तासमीकरणे नव्याने आकार घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.