Video : तुम्हीही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात होऊ शकतात सहभागी; पहा विराट, रोहित, द्रविड काय सांगताय...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 एप्रिल 2020

भारतात क्रिकेटकडे धर्म म्हणून पाहिले जाते आणि क्रिकेटपटूंना तर दैवताचे स्थान दिले जाते बीसीसीआय हाच धागा पकडून  जनतेपर्यंत चांगला संदेष पाठवणार आहे. सर्वांना मास्क वापरण्यासाठी टीम इंडिया टीम मास्क फोर्स असे या मोहिमेचे नाव आहे.

मुंबई : भारतात क्रिकेटकडे धर्म म्हणून पाहिले जाते आणि क्रिकेटपटूंना तर दैवताचे स्थान दिले जाते बीसीसीआय हाच धागा पकडून  जनतेपर्यंत चांगला संदेष पाठवणार आहे. सर्वांना मास्क वापरण्यासाठी टीम इंडिया टीम मास्क फोर्स असे या मोहिमेचे नाव आहे.

मोठी बातमीलॉकडाऊनमध्ये पॉर्न बघणाऱ्यांनो सावधान ! नसत्या गोष्टी लागतायत मागे...

लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही आपद्कालिन परिस्थितीत बाहेर पडत असला तरी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सरकारने केले आहे याची जनजागृती करण्यासाठी बीसीसीआयने तोंडाला  मास्क लावण्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

हे ही वाचा : बनवाबनवी ! लॉकडाऊन मोडत गॅस वितरकाचा ड्रेस घालून तरुण निघाले गावी, मग पोलिसांनी पकडलं अन्

टीम इंडियाचा कर्णधार, विराट कोहली याच्यासह बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली,  रोहित शर्मा, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, मिताली राज हे या व्हिडियोत घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे किती आवश्यक आहे हा संदेश देत आहेत.

 

#TeamIndia is now #TeamMaskForce!

Join #IndiaFightsCorona and download @mygovindia's @SetuAarogya mobile application @PMOIndia @narendramodi pic.twitter.com/M06okJhegt

— BCCI (@BCCI) April 18, 2020

 

 

महत्वाची बातमी :दोन दिवस कमी झालेली कोरोना रुग्णाची संख्या आज पुन्हा  वाढली  

कोरोनाच्या मुकबल्यासाठी बीसीसीआय आपल्याबाजूने सरकारला मदत करत आहे. बीसीसीआयने स्वतः 51 कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडला दिले आहेत. त्याचबरोबर प्रमुख खेळाडूंनीही आर्थिक सहाय्य केलेले आहे. 
कोरोनाच्या महामारिचा सामना करताना आम्ही प्रथम देशाचा विचार करत आहोत. क्रिकेटबाबत नंतर विचार करून. आमच्यासाठीही सर्वांचे आरोग्य महत्वाचे आहे, असे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे.

 

TeamIndia is now TeamMaskForce is trending 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TeamIndia is now TeamMaskForce is trending