प्रा. तेलतुंबडे यांना जामीन नाहीच, 8 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

ANAND TELTUMBDE
ANAND TELTUMBDE

मुंबई : शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला आहे. प्रक्रुतीच्या कारणाने तूर्तास जामीन द्यावा, अशी मागणी तेलतुंबडे यांनी केली होती. ती फेटाळत तेलतुंबडे यांना 8 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एनआयएकडे शरणागती पत्करली होती. शनिवारी विशेष एनआयए न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले.

कोरोनाचा धोका असल्याने तात्पुरता जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती; मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे. विशेष न्यायमूर्ती डी. इ. कोथळीकर यांनी तेलतुंबडे यांना तळोजा कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले. तसेच त्यांच्या प्रक्रुतीची वैद्यकीय तपासणी करून रविवारी अहवाल दाखल करण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला दिले आहेत.

Teltumbde has been remanded in judicial custody till May 8

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com