तापमानाचा पारा घसरल्याने ‘कोरोना’ची भीती वाढली

तापमानाचा पारा घसल्याने ‘कोरोना’ची भीती वाढली
तापमानाचा पारा घसल्याने ‘कोरोना’ची भीती वाढली

ठाणे : जगभर दहशत पसरवलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या धास्तीने भल्याभल्यांची भंबेरी उडत आहे. उष्ण कटिबंधात हे घातक विषाणू जास्त काळ तग धरत नाहीत; मात्र गेल्या काही दिवसात वातावरणात बदल जाणवत असल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. त्यातच शुक्रवारी (ता. १३) पारा तब्बल २० अंशावर घसरल्याने ठाण्यात थंडी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीतीदेखील वाढल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडीच्या काळात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. 

वाढत्या नागरीकरणाबरोबरच ठाण्यात अनेक प्राकृतिक बदल होत असले, तरी विपुल वनराईमुळे थंडीचा पारा काही अंशी कमीच जाणवतो. त्यात यंदा अवकाळी पावसानंतर थंडीच्या मोसमातदेखील पाऊस बरसला होता आणि आता पुन्हा थंडीचा मोसम सुरू झाल्याने सर्वांनाच कोरोनाची धडकी भरली आहे. गेल्या आठवड्यात पारा ३२ अंशांवर स्थिरावल्याचे दिसून येत आहे. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील नोंदीनुसार गुरुवारी (ता. १२) किमान तापमान २१ अंश सेल्सियस; तर कमाल तापमान ३१ अंशावर होते; तर शुक्रवारी (ता. १३) किमान तापमान २० अंश आणि कमाल तापमान ३२ अंशावर स्थिरावले होते. शीत वातावरणात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.

वातावरणातील बदल धोकादायक
यंदा पाऊस अनियमित पडल्याने वातावरणातदेखील झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. मध्यंतरी थंडीच्या मोसमात पडलेल्या रिमझिम पावसामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले. त्यामुळे डिसेंबरअखेरीस तसेच जानेवारी महिन्यात सुरू झालेला थंडीचा मोसम हळूहळू बदलू लागला आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत थंडावा; तर दुपारी कडक उन्हाच्या झळा बसू लागल्याने तापमानातील हे बदल आजार बळावणारे ठरू शकतात, असे मत हवामानतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

नीचतम तापमान म्हणजेच अगदी ५ अंश सेल्सियस तापमानाला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो; मात्र याबाबत अद्याप तरी कोणतेही वैद्यकीय अथवा शास्त्रीय अनुमान नाहीत. तापमान कमी झाल्याने सर्दी-पडसे अथवा खोकला होण्याचा धोका संभवतो. तेव्हा, असे किरकोळ आजार म्हणजे कोरोना नसून साधा फ्लू किंवा इतर व्हायरस असण्याची शक्‍यता असते; तरी नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने प्राथमिक उपचारासह नियमित वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे. 
- डॉ. कनिष्क दावडा, ज्युपिटर रुग्णालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com