esakal | मविआ सरकार येताच ‘या’ प्रस्तावाला मिळतीये तत्काळ मंजुरी!
sakal

बोलून बातमी शोधा

‘मेट्रो-२ ए’मार्गासाठी ५०८ झाडांवर गंडांतर

राज्यात भाजपप्रणीत सरकार असताना मेट्रो रेल्वेशी संबंधित प्रत्येक प्रस्ताव मुंबई महापालिकेत अडकत होता. राज्यात सत्तांतर झाल्यावर मेट्रोशी संबंधित प्रत्येक प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळू लागली आहे. वृक्ष प्राधिकरणाने शुक्रवारी मेट्रो मार्गातून ५०८ झाडे हटवण्याची परवानगी दिली आहे. त्यापैकी १६२ झाडे कापण्यात येणार आहेत.

मविआ सरकार येताच ‘या’ प्रस्तावाला मिळतीये तत्काळ मंजुरी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात भाजपप्रणीत सरकार असताना मेट्रो रेल्वेशी संबंधित प्रत्येक प्रस्ताव मुंबई महापालिकेत अडकत होता. राज्यात सत्तांतर झाल्यावर मेट्रोशी संबंधित प्रत्येक प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळू लागली आहे. वृक्ष प्राधिकरणाने शुक्रवारी मेट्रो मार्गातून ५०८ झाडे हटवण्याची परवानगी दिली आहे. त्यापैकी १६२ झाडे कापण्यात येणार आहेत.

ही बातमी वाचली का? रविवारी हार्बर, पश्‍चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक!

गोरेगाव येथील आरे वसाहतीमधील प्रस्तावित कारशेडवरून शिवसेना आणि भाजप यांचे संबंध चांगलेच ताणले गेले होते. मेट्रोसाठी महापालिकेचे भूखंड देण्याचा प्रस्तावही हाणून पाडला होता. महापालिका प्रशासनाने विशेष अधिकार वापरून हे भूखंड मेट्रो प्रकल्पासाठी हस्तांतरित केले होते. आता राज्यात महाविकास आघाडी सरकार आले आहे.

ही बातमी वाचली का? वाचा काय आहे हापूस प्रेमींसाठी गोड बातमी

अंधेरी पश्‍चिमेकडील डी. एन. नगर ते ओशिवरा नाला दरम्यानच्या नियोजित मेट्रो लाईन-२ ए च्या बांधकामात अडथळा निर्माण करणारी ३२ झाडे कापण्यात येणार असून, ९० झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. गोरेगाव पश्‍चिमेकडील मेट्रो-२ ए प्रकल्पाच्या गोरेगाव व बांगूरनगर स्थानकांच्या बांधकामात अडथळा असलेली २९ झाडे कापणे व ८५ झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी मागण्यात आली आहे.

ही बातमी वाचली का? कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एमपीएससीच्या परिक्षांसंदर्भात महत्त्वाची बातमी

कांदिवली पश्‍चिम येथील मेट्रो २ए वरील लालजीपाडा ते महावीर नगरदरम्यानच्या कामात अडथळा निर्माण करणारी ५३ झाडे कापणे व २१ झाडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव आहे. दहिसर पूर्व ते डी. एन. नगर या भागातील ६४ झाडे कापली जाणार असून, ३७ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. लिंक रोड ते चारकोप कारशेड डेपो, मालाड पश्‍चिम येथील ११ झाडांवर कुऱ्हाड पडणार असून, ८६ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत.

ही बातमी वाचली का? ४० गावांना गढूळ पाणीपुरवठा

प्रस्तावांना एकमताने मंजुरी
मेट्रो मार्गातील १६२ झाडे कापणे आणि ३४६ झाडे पुनर्रोपित करण्याचे प्रस्ताव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणात मांडण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या सर्व प्रस्तावांना एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.

loading image