esakal | उघड दार देवा आता; भाविकांची विनवणी कायम, मंदिर प्रवेशांवर अनेक निर्बंध | Temple opens
sakal

बोलून बातमी शोधा

siddhivinayak mandir

उघड दार देवा आता; भाविकांची विनवणी कायम, मंदिर प्रवेशांवर अनेक निर्बंध

sakal_logo
By
सकाळ वृत्तेसवा

मुंबई : राज्य सरकारच्या (mva Government) आदेशानुसार गुरुवारपासून राज्यातली मंदिरे उघडणार (Temple opens) असली, तरी काही ठिकाणी भाविकांना ऑनलाईन अपॉईंटमेंट (online appointment), दोन लशी किंवा कोरोना चाचणी (corona test) आदी कठोर निर्बंधांना तोंड द्यावे लागणार आहे. दहा वर्षांखालील मुले, गर्भवती तसेच ज्येष्ठांना प्रवेश नसेल, तर इतरांना प्रसाद आणण्यावरही निर्बंध राहतील.

हेही वाचा: दागिना बाजार येथे बंगाली बांधवांच्या रक्तदानाने ३११ युनिट रक्त संकलन

कोरोनामुळे गेले काही महिने बंद असलेली देवळे घटस्थापनेपासून उघडणार आहेत. त्यामुळे भाविकांच्यात तसेच मंदिर प्रशासनातही मोठा उत्साह आहे; मात्र कोरोनाचे सावट अजूनही कमी झाले नसल्याने मास्क, सोशल डिस्टन्स, तापमान मोजणी, सॅनिटायझर आदी आरोग्यविषयक नियम पाळूनच मंदिरांमध्ये प्रवेश दिला जाईल, असे मुंबादेवी मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी ‘सकाळ’ला सांगितले. प्रवेशासंदर्भातील नियम सिद्धिविनायक मंदिर उद्या (मंगळवार) जाहीर करेल; तर महालक्ष्मी मंदिराचे ऑनलाईन अॅप उद्या सुरू होण्याची शक्यता आहे, असे सरव्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये म्हणाले.

सरकारने मंदिर प्रवेशासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंटची सक्ती केली नसली, तरी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांच्या सूचनेवरून अनेक देवळांनी तशी व्यवस्था केली आहे. आतापर्यंतचा अनुभव तसेच सरकार, महापालिका, पोलिस आदींच्या वेगवेगळ्या सूचनांमुळे प्रत्येक मंदिरातील नियमही वेगवेगळे असतील. काही ठिकाणी प्रसाद-फुले आणण्यास बंदी आहे, तर काही मंदिरात फुले लांबूनच देवाला दाखवून परत नेण्यास सांगितले जाईल, तर काही ठिकाणी ती फुले विशिष्ट जागी ठेऊन नंतर ती देवाला दाखवून निर्माल्य कलशात टाकली जातील.

हेही वाचा: नवी मुंबईत डासांची भुणभुण; नागरिकांमध्ये डेंगी, मलेरियाची भीती

मुंबादेवी मंदिर
वेळ - सकाळी ७ ते संध्याकाळी ६
बंदी कोणाला - १० वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील नागरिक, गर्भवती स्त्रिया.
निर्बंध - दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असावेत किंवा नजीकच्या काळात कोरोना चाचणी केली असावी.
प्रसाद-फुले स्वीकारली जाणार नाहीत व दिलेही जाणार नाही.
वेळ ठरवण्यासाठी वेबसाईट www.mumbadevi.org.in

महालक्ष्मी मंदिर
वेळ - सकाळी ६ ते रात्री १०
ऑनलाईन प्रवेश मर्यादा - ताशी ४५० ते ५०० भाविक.
बंदी कोणाला - १० वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील नागरिक, गर्भवती स्त्रिया.
निर्बंध - प्रसाद आणण्यास संमती नाही. फुले विशिष्ट ठिकाणीच ठेवावी लागतील, नंतर मंदिरातर्फे ती देवीला दाखवली जातील.
अॅप - मंगळवारी किंवा बुधवारी सुरू होईल.

सिद्धिविनायक मंदिर
प्रवेशाबाबत माहिती मंगळवारी दिली जाईल.

loading image
go to top