
Mumbai Local Train Viral Video News : मुंबई लोकलमधून उतरताना एका महिलेची ओढणी अडकली अन् लोकलनं वेग पकडल्यानं ती महिला देखील लोकलसोबत ओढली गेल्याची थरारक घटना मुंबईत घडली. याचक्षणी प्रसंगावधान राखत एका महिला पोलिसानं त्या महिलेला आश्चर्यकारकरित्या वाचवलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.