बोरिवलीत युवक भररस्त्यात तलवार घेऊन उतरला; अन्..! वाचा नेमकं काय घडलं?

बोरिवलीत भररस्त्यात युवक तलवार घेऊन उतरला; वाचा नेमकं काय घडलं?
बोरिवलीत भररस्त्यात युवक तलवार घेऊन उतरला; वाचा नेमकं काय घडलं?

दहिसर :  बोरिवली-दहिसर परिसरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने संपूर्ण परिसर पुन्हा एकदा लॉकडाऊन केला आहे. येथे पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. असे असतानाही बोरिवली पश्चिमेकडील गणपत पाटील नगर येथील मुख्य लिंक रोडवर सोमवारी दिवसाढवळ्या गुंडांची दहशत दिसून आली. 

याठिकाणी दोन गटात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.  धक्कादायक बाब म्हणजे या व्हिडिओत एक युवक हातात नंगी तलवार घेऊन रस्ता ओलांडत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. गणपत पाटील नगरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून बॅरिकेट लावण्यात आले आहे. या ठिकाणी एमएचबी ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असतानाही दिवसाढवळ्या झालेल्या हाणामारीमुळे परिसरात खळबळ माजली आहे. 

याठिकाणी अनेक अवैध धंदे होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गेल्याच महिन्यात याच परिसरात बॅरिकेट लावण्यावरून एका महापालिकेच्या अभियंत्याला गुंडांनी बेदम मारहाण केली होती. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंडित ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com