
वीस वर्षांच्या अंतरानंतर ठाकरे बंधू एकत्र येऊन प्रथमच निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. द बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यावर्षी ही निवडणूक शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीने लढवली जाणार आहे. यामुळे आता याची चर्चा रंगत आहे.