esakal | ठाकरे सरकारने कल्याणकरांची फसवणूक केली - मंत्री कपिल पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

kapil patil

ठाकरे सरकारने कल्याणकरांची फसवणूक केली - मंत्री कपिल पाटील

sakal_logo
By
रविंद्र खरात

कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) असताना कल्याण (Kalyan West) पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र, ठाकरे सरकारने (Shivsena) मागच्या दीड वर्षात मागच्या सरकारचे कामे पूर्ण करत, उद्घाटन करत असून नव्याने निधी न दिल्याने कल्याण पश्चिममधील नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमधील एका कार्यक्रमात केला.

हेही वाचा: 'शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काचे घर द्या'; महिलांचा धडक मोर्चा

माजी आमदार नरेंद्र पवार यांनी त्यांनी आमदार असताना कल्याणमधील उद्यानसाठी विशेष कोट्यवधी रुपयांचा निधी आणला होता. त्यातील एका उद्यानाचे लोकार्पण सोहळा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नरेंद्र पवार शशिकांत कांबळे, प्रेमनाथ म्हात्रे, वरूण पाटील, मोरेश्वर भोईर समवेत मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हजेरी लावली होती.

भर पावसात उद्घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना नरेंद्र पवार यांच्या कामाचे कौतुक करत पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. मात्र ठाकरे सरकारने मागील सरकारची कामे पूर्ण करत उद्घाटन केली.

हेही वाचा: मुंबईतील चौपाट्यांचा होणार कायापालट ? रेती बंदरावर उद्यानाचे आकर्षण

नवीन निधी नाही, की उद्घाटन नसल्याची टीका पाटील यांनी करत आगामी होणाऱ्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करत पुढे म्हणाले की, मेट्रोची कामे भिवंडीमध्ये 60 ते 65 टक्के झाली असून, भिवंडी ते कल्याण मेट्रोच्या कामाची निविदा काढली नसल्याचा आरोप पाटील यावेळी करत मोदींनी मंत्रिमंडळात महिलाना जास्तीतजास्त मंत्रीपद देऊन महिलांचा सन्मान केल्याचा दावा यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला .

loading image
go to top