

Thane Politics
ESakal
ठाणे : महापालिका निवडणुकीमध्ये दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नऊ नगरसेवकांनी शपथपत्रात खोटी माहिती दिली असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे. कथितरीत्या चुकीची, अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात केली आहे. या प्रकरणाची तिसरी सुनावणी ११ जून रोजी ठाणे न्यायालयात होणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.