Thane: ठाणेकरांचा गारेगार प्रवास स्वप्नातच! ई-बस पडल्या धूळखात, दीड महिन्यांपासून १०० पैकी ९८ गाड्या आगारातच; कारण काय?

Thane E-Bus: ठाणे पालिकेला पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बस उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, चालकांअभावी १०० पैकी ९८ बस दीड महिन्यापासून आगारातच उभ्या असून प्रवाशांना सेवेची प्रतीक्षा आहे.
Thane E-Bus Service

Thane E-Bus Service

ESakal

Updated on: 

ठाणे : ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर व गारेगार तसेच पर्यावरणपूरक असा व्हावा, यासाठी ठाणे पालिकेच्या परिवहन उपक्रमास पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १०० बसपैकी ९८ वस उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, या बस चालकांअभावी गेल्या दीड महिन्यांपासून कोलशेत आगारात उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळू शकलेला नाही. ठाणेकरांचे अधिक सुखकर व गारेगार प्रवासाचे स्वप्न भंगले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com