High Court Grants Bail to Thane Officer in Bribery Case Threat Call Raises Questions
Esakal
मुंबई
Thane : लाच प्रकरणी निलंबित अधिकाऱ्याला हायकोर्टाकडून जामीन मंजूर, तर तक्रारदाराला पोलिसासमोरच अज्ञातांकडून धमकी
Thane News : उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणी अटक केली असून हायकोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केलाय. तर एलसीबी कार्यालयात तपास अधिकाऱ्यासमोरच तक्रारदाराला अज्ञाताने फोनवरून धमकी दिल्याचं समोर आलंय.
ठाणे महानगरपालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ७० लाखांच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना शुक्रवारी हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करत आहे. दरम्यान, पोलिसांसमोर तक्रारदार असताना अज्ञातांकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडलीय.

