Thane Builder Fraud 112 Flat Owners Cheated with Illegal Buildings on Government Land
Esakal
मुंबई
ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक
Thane News : गेल्या ३६ वर्षांपासून सरकारी जागेत ३ इमारती बांधल्याचं ना प्रशासनाला समजलं ना सरकारला. एका फ्लॅटधारकाने केलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय.
Thane Real Estate Fraud: राज्य सरकारची मालकी असलेल्या जमिनीवर एका बांधकाम व्यावसायिकानं ३ इमारती उभारल्या. ३६ वर्षांपूर्वी त्यानं हे बांधकाम केलं आणि तिथल्या रहिवाशांची ४४ कोटींची फसवणूक केली. आता ही राज्य सरकारच्या मालकीची जमीन स्वत:च्या नावावर करण्याचा घाट त्यानं घातला होता. पण त्याआधीच हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. ठाण्यात उघडकीस आलेल्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

