esakal | ठाणे : देवी विसर्जनाच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाणे : देवी विसर्जनाच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवडीत (bhiwandi) नवरात्र उत्सवानिमित्ताने स्थापन करण्यात आलेल्या अंबेमाता मूर्तीचे येत्या शुक्रवारी विसर्जनाचा सोहळा विविध विसर्जन घाटांवर होणार आहे. नागरिकांच्या सोईसाठी भिवंडी (bhiwandi) शहरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून या संदर्भात ठाणे (Thane) वाहतूक शाखा पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी अधिसूचना जाहीर केली आहे.

हेही वाचा: पिंपरी : शहरातील १७२ शाळांची संच मान्यतेची अपूर्ण माहिती

भिवंडी शहरातील कारिवली हनुमान मंदिराजवळ वीटभट्टी, सुतार आळी नाका या भागातून मंडईकडे जाणाच्या सर्व वाहनांना सुतार आळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. सदरची वाहने सुतार आळी, इदगाह रोड अथवा दर्गाह रोड मार्गाने इच्छितस्थळी जातील. तसेच कोटरगेट जकात नाका येथून मंडई, बाजारपेठ व तीनवत्तीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना हनुमान बावडी, मिरॅकल मॉल येथे प्रवेश बंद आहे.

loading image
go to top