

ठाणे : महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे शिंदे सेना आणि भाजपत जागावाटपासाठी बैठका सुरू आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांचेदेखील चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. अशातच ठाणे कॉंग्रेस महाविकास आघाडीसोबत निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडे ३५ ते ४० जागांचा प्रास्तव सादर केला आहे. तसेच २४ तारखेपर्यंत यासंदर्भात मत कळवावे, अशी विनंतीदेखील निवेदनाद्वारे केली आहे.