ठाणे : कळव्यात गरोदर पत्नीला पेटवले

पत्नीला पेटवले
पत्नीला पेटवलेsakal media

कळवा : घरी झालेल्या भांडणातून कळवा पूर्वमधील (kalwa east) फतलाल झोपडपट्टीमध्ये (slum area) गर्भवती पत्नीला (pregnant woman) पतीने रॉकेल टाकून पेटवून (kerosene fire) दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ३०) रात्री घडली. यामध्ये महिला गंभीररीत्या भाजली असून तिच्या पोटातील सहा महिन्यांच्या अर्भकाचा मृत्यू (child death) झाला आहे. कळवा पोलिसांनी (kalwa police) आरोपी पती अनिल चौरसिया याला अटक (culprit arrested) केली आहे.

पत्नीला पेटवले
"नवाब मलिक जावयामुळे वेडे झालेले जगातील पहिले सासरे"

मफतलाल कॉलनीमध्ये अनिल बहाद्दूर चौरसिया हा आपल्या गर्भवती पत्नीसह राहतो. गेल्या काही दिवसांपूर्वी अनिल याने दुसरे लग्न केले आहे. यावरून अनिल व त्याच्या पहिल्या सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीमध्ये वारंवार भांडण होत होते. शनिवारी रात्री त्यांच्यामध्ये जोराचे भांडण झाले. त्या रागातून अनिल याने पत्नीवर रॉकेल टाकून पेटवून दिले.

तिचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी आग विझवत तिला कळवा रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असून तिच्या पोटातील सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. याप्रकरणी कळवा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com