ठाणे जिल्ह्याची रुग्णसंख्या 2 हजारी पार! 24 तासांत 184 नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 9 May 2020

  • ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित 2 हजाराच्या पार! 
  • 24 तासांत 184 नवे रुग्ण तर,  तिघांच्या मृत्यूची नोंद 

ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होत असून शनिवारी (ता. 9) देखील 184 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याने बाधितांचा एकूण आकडा दोन हजाराच्या पार गेला आहे. तसेच तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने मृतांचा आकडा 49 वर गेला आहे, तर बाधितांचा आकडा 2 हजार 6 इतका झाला आहे.

ठाणे पालिकेच्या आरोग्य सेवेचा बोजवारा! रुग्णवाहिका कर्मचारी, आशा स्वयंसेविकांचे वेतन 5 महिने रखडले

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असताना देखील मंगळवारपासून (ता. 5) जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गुरुवारी बाधितांची आकडेवारी दीडशेच्या उंबरठ्यावर जावून पोहोचली असतानाच शनिवारी ही आकडेवारी थेट दोनशेच्या उंबरठ्यावर जावून पोहोचली आहे. 

कोरोनामुळे गुगल आणि फेसबुक या दोन मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

शनिवारी ठाणे पालिकाक्षेत्रात 60 कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आल्याने शहरातील बाधितांचा आकडा थेट 671 वर पोहोचला आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात 65 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 592 तर मृतांचा आकडा 12 झाला आहे. कल्याण डोंबिवलीत देखील 25 नवे रुग्ण आढळले असून एका बाधिताचा मृत्यू झाला असल्याने बाधितांचा एकूण आकडा 305 तर मृतांचा आकडा 4 झाला आहे. तसेच शुक्रवारी (ता. 8) रात्री उशिरा मीरा-भाईंदरमध्ये 12 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. तर,  शनिवारी 7 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने तेथील बाधितांचा आकडा 242 इतका झाला आहे. तसेच उल्हानगरमध्ये देखील धक्कादायक 16 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने तेथील बंधीतांचा आकडा 34 झाला आहे. बदलापूरमध्ये 5 नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा 51 झाला. तसेच अंबरनाथमध्ये एका रुग्णांची नोंद झाल्याने तेथील आकडा 13 वर गेला आहे. तर,  ठाणे ग्रामीण भागात 5 नव्या बाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे तेथील बाधितांचा आकडा 77 वर गेला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane district has more than 2,000 patients! 184 new patients in 24 hours