जेष्ठ नागरिकांची काळजी घ्या! ठाण्यातून ही धक्कादायक माहिती आली समोर...

राहुल क्षीरसागर
शुक्रवार, 1 मे 2020

ठाणे जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूंमध्ये वृद्धांचे प्रमाण अधिक
साठी पार केलेल्या 10 जणांच्या मृत्यूची नोंद  

ठाणे : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून ठाणे जिल्ह्यात देखील या आजाराने बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे या आजाराने जिल्ह्यातील तरुणाईला आपल्या विळख्यात घेतलेले असतांना दुसरीकडे मृत्यूंमध्ये मात्र वयोवृद्ध रुग्ण अधिक आहेत. त्यांच्यातील प्रतिकार शक्ती कमी असल्याने असे होत असल्याचे दिसून येत आहे

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याबरोबरच विविध महत्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आले आहे. तरीदेखील शहरी भागात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला कोरोना या आजाराने बाधित होणाऱ्यांची संख्या 940 इतकी झाली असून आतापर्यंत या आजारातून 188 जण उपचारांती पूर्णतः बरे झाले आहेत. तर, मृत्यू झालेल्यांची संख्या 22 आहे. यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे. यामध्ये 15 पुरुष तर,  7 महिलांचा समावेश आहे. तसेच मृतांच्या वयोगटाचा विचार केल्यास 51 ते 60 वयोगटातील 5 तर 60 वर्षांवरील वयोगटातील 10 जणांचा समावेश आहे. यामध्ये देखील 10 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. याव्यतीरिक्त 11 ते 50 वयोगटातील 5 पुरुष तर, 2 महिला रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

३ मे नंतर काय ? मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह मधून सांगितलं 'असं' काही...
--------- 
ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक मृत्यू
ठाणे जिल्ह्यात 6 महापालिका व 2 नगरपालिका यांचा समावेश आहे. या मध्ये सर्वाधिक बाधितांची संख्या ठाणे महापालिका क्षेत्रात असून मृतांचा आकडा देखील सर्वाधिक आहे. ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत आतापर्यंत 310 जणांना कोरोनाची लागण झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

Big News - परवानगी दिली ! विविध राज्यांमध्ये अडकलेल्यांसाठी सरकार सोडणार विशेष ट्रेन..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Thane district, the proportion of elderly people in corona deaths is higher