चिंताजनक ! ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ, जाणून घ्या रुग्णसंख्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

जिल्ह्यात शहरी भागांपाठोपाठ ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे : जिल्ह्यात शहरी भागांपाठोपाठ ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. बाधितांसोबतच मृतांच्या संख्येत देखील वाढ होत असून सोमवारी (ता. 4) जिल्ह्यात 95 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 1 हजार 278 इतका झाला असून मृतांचा आकडा 34 वर पोहोचला आहे. 

हे नक्की वाचा : पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारला सुचवले 'हे' उपाय

दरदिवशी जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत शनिवारी सर्वाधिक 97 रुग्णाची नोंद करण्यात त्यापाठोपाठ सोमवारी देखील 95 नवीन बाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद होत असल्याचे दिसून येत आहे. यात नवी मुंबई पालिका क्षेत्रात सर्वाधिक 34 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून तेथील बाधितांचा आकडा 348 वर पोहोचला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 23 बाधितांची नोंद करण्यात आल्याने तेथील संख्या 412 वर गेली आहे. कल्याण डोंबिवलीत 18 रुगांची नोंद झाल्याने तेथील बाधितांचा आकडा 213 झाला.

हे ही वाचा : अन् दारुची दूकाने उघडलीच नाही... नवी मुंबईतील तळीरामांचा हिरमोड

तसेच मीरा भाईंदरमध्ये 10 रुग्ण आढळून आल्याने तेथील बाधितांचा आकडा 181 झाला. तर,  एकाच्या मृत्यूमुळे तेथील मृतांचा आकडा 4 वर गेला आहे. भिवंडीत एका बाधिताच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा 19 इतका झाला. अंबरनाथमध्ये देखील 1 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील आकडा 11 वर पोहोचला आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात देखील 8नवे रुग्ण आढळल्याने तेथील बाधितांचा आकडा 47 वर गेला आहे.

Thane district recorded the highest number of 95 patients in 24 hours


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane district recorded the highest number of 95 patients in 24 hours