ठाणे जिल्ह्याची चिंता वाढली; एका दिवसांत 46 मृत्यू तर रुग्णांची उच्चांकी नोंद...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 38 हजार 594 तर मृतांची संख्या 1176 झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे.

ठाणे : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यात शुक्रवारी जिल्ह्यात दिवसभरात बाधित रुग्णांची संख्या 2027 तर 46 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 38 हजार 594 तर मृतांची संख्या 1176 झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे.

कोरोनावरील सर्वात प्रभावी अशा 'टॉसिलीझुमॅब'चा तुटवडा, परिणाम होंतोय नवी मुंबई ठाण्यातील रुग्णांवर

शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक 564 रुग्णांसह तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 8049 तर मृतांची संख्या 130 इतकी झाली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत 420 बाधितांची तर 17 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या 9950 तर, मृतांची संख्या 369 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 257 रुग्णांची तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 7602 तर मृतांची संख्या 232 वर पोहोचला आहे..

मंत्री महोदय म्हणतात, 'कोरोनिल'ने कोरोना बरा होत नाही; खबरदार संभ्रम निर्माण केला तर...

भिवंडी महापालिका क्षेत्रात 62 बाधितांसह 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 173 तर मृतांची संख्या 118 वर पोहोचली. त्यात मिरा भाईंदरमध्ये 276 रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3885 तर मृतांची संख्या 152 इतकी झाली आहे. उल्हासनगर 191 रुग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2347 तर मृतांची संख्या 49 झाली आहे. 

...म्हणून केरळहून आलेलं वैद्यकीय पथक माघारी परतलंय; जाणून घ्या काय झालं तर...

अंबरनाथमध्ये 101 रुग्णांची तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद केल्याने बाधितांची संख्या 2032 तर मृतांची संख्या 57 झाली आहे. बदलापूरमध्ये 48 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 906 झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात 108 रुग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 1907 तर मृतांची संख्या 54 वर गेली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ! मुंबईकरांनो हवामान खातं म्हणतंय....

महापालिका क्षेत्र      रुग्णसंख्या    मृत
ठाणे      420             17
कल्याण-डोंबिवली  564             03
नवी मुंबई                        257   08
मिरा-भाईंदर    276             03
भिवंडी 62     04
उल्हासनगर 191 02
अंबरनाथ    101            05
बदलापूर 48   00
ठाणे ग्रामीण 108  04

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane district registered highest number of corona positive today