

water scarcity
ESakal
राहुल क्षीरसागर
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून भावली योजना राबविण्यात येत असली, तरी ही योजना अद्याप मार्गी लागलेली नाही. ती नेमकी कधी पूर्ण होणार, याबाबतही कोणताही ठोस कालावधी निश्चित नसल्याने पाणीटंचाईची समस्या अधिक गडद होत आहे. टंचाईग्रस्त गाव-पाड्यांसाठी दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार मागील वर्षी १२ कोटी ६६ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता; मात्र यंदा या खर्चात जवळपास दुप्पट वाढ होऊन हा आराखडा थेट २७ कोटी ३१ लाख रुपयांवर पोहोचला आहे.