ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे हृदय विकाराच्या धक्याने निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant Marathe
ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे हृदय विकाराच्या धक्याने निधन

ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे हृदय विकाराच्या धक्याने निधन

ठाणे : ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे(Vasant Marathe) यांचे शुक्रवारी सकाळी हृदय विकाराच्या (heart attack)धक्याने निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात मुलगा, नातु आणि पणती असा परिवार आहे. घंटाळी विष्णु निवास येथे ते वास्तव्यास होते.

हेही वाचा: चोरांचा मटणावर डल्ला, मतदारांनी अंड्यांवर भागवली भूक

शुक्रवारी सकाळी ते नेहमी प्रमाणो कचराळी येथे फेरफटका मारण्यास गेले होते. त्यानंतर ते घरी गेले असता, त्यांना त्रस होऊ लागला. त्यावेळेस घरच्यांनी त्यांना डॉक्टरकडे जाऊया असे सांगितले. मात्र त्यांनी थोडा वेळ आराम करतो असे सांगितले. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यात त्यांचा मृत्यु झाला. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेर श्वास घेतला. १९३४ साली जन्मलेले वसंत नारायण उर्फ योगीदास मराठे हे १९५६ सालापासून ठाण्यात राहत होते. समाजसेवेची आवड असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थापनेपासूनच त्यांचा शिवसेनेत सहभाग होता.

हेही वाचा: मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

१९६७ सालच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे ठाणे नगरपालिकेवर त्यांची निवड झाली आणि ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. दोन वर्ष नगराध्यक्ष आणि सहा वर्ष नगरपालिकेचे सभासद राहिले. १९७३ साली शिर्डीच्या साईबाबांनी स्वप्नदर्शन देऊन त्यांचं जीवन बदलून टाकलं. मग त्यांनी राजकारण संन्यास घेऊन धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला. १९९९ सालापासून श्रीमद् भगवद्गीतेचा अभ्यास, मनन, चिंतन आणि प्रवचनाच्या माध्यमातून भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार हेच त्यांचं अखेरपर्यंत जीवित कार्य राहिलं. वसंत मराठे यांचे ठाण्यासाठी असलेले योगदान हे निश्च‍ितच आम्हाला यापुढेही प्रेरणादायी राहिल, ठाण्याचा प्रथम नागरिक या नात्याने त्यांना ठाणेकरांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करीत असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.(Latest Thane News)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top