

Land Fraud Case
ESakal
ठाणे : मूळ जमीनमालकाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या नावावरील मुखत्यारपत्राचा वापर करून जमिनीची विक्री केल्याचा प्रकार मुंब्रा येथे उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्रीखत तयार करून सरकारी नोंदींमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.