

Thane Education System
ESakal
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पटसंख्या वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असतानाच, शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. गुजराती माध्यमातील शिक्षकांकडून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवले जात असल्याची बाब नगरसेवक अनिल भोर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता नसलेले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा दावा करत त्यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला.