ठाणे पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे यांना पदावरून हटवले; कारण की... 

thane corporation
thane corporation

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात डॉ. चारुदत्त शिंदे यांचा उपयोग होत नसल्याचे कारण देत त्यांना या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणाबाबत त्यांची महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. 
ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती केलेल्या डॉ. चारुदत्त शिंदे यांना बुधवारी त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी संध्याकाळी उशिरा हे आदेश काढले आहेत. त्यांच्याकडील तात्पुरता पदभार वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. मुरुडकर यांच्यावर सोपवण्यात आला आहे. 

डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यावर ठाण्यात कोव्हिडचा प्रादुर्भाव कमी करण्याबरोबरच याच रुग्णालयांची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र शिंदे यांचे काम योग्य होत नसल्याने त्यांना या पदावरून कार्यमुक्त करून त्यांच्या पूर्वीच्या पदावर पाठवण्यात येत असल्याचे पालिका आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.  मात्र असे असले तरी या रुग्णालयात जनार्दन सोनावणे आणि भालचंद्र गायकवाड यांच्या मृतदेहांच्या अदलाबदली प्रकरणामुळेच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असल्याची चर्चा आहे.

ठाणे महापालिकेच्या बाळकुम येथील ग्लोबल इम्पॅक्त हब या रुग्णालयात भालचंद्र गायकवाड आणि जनार्दन सोनावणे त्यांच्या मृतदेहांच्या अदलाबदलीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे, महापौर नरेश म्हस्के त्यांच्यासह दोन्ही मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठा दबाव असल्याने पालिका आयुक्तांकडून त्वरित ही कारवाई करण्यात आली असल्याचे चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com