Thane News: अतिक्रमणांना दणका! ठाणे शहरात १७८ ठिकाणी पालिकेची कारवाई
Thane Municipal Corporation: ठाणे शहरात १७८ ठिकाणी अतिक्रमणांविरोधात ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. दोन दिवसांत शाळा, मंदिर, हॉस्पिटल परिसर अतिक्रमण मुक्त केला आहे.
ठाणे : शहरातील संवेदनशील ठिकाणांवरील बेकायदा पानटपन्या, चिकन शॉप, चायनीज स्टॉलविरोधात ठाणे महापालिकेने कारवाईचा धडाका लावला आहे. दोन दिवसांत शहरातील १७८ पानटपऱ्या, हातगाडधावर कारवाई करताना शाळा, मंदिर, हॉस्पिटल परिसर अतिक्रमण मुक्त केला आहे.