Thane News: पाण्यासाठी मुंबईकडे धाव! ठाणे पालिकेकडून पिसे बंधाऱ्यातील ५० एमएलडीची मागणी

Thane Municipal Corporation: ठाणे शहराला ३१ एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाल्यामुळे ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेकडे दररोज ५० एमएलडी कच्चे पाणी देण्याची मागणी केली आहे.
Thane municipal corporation

Thane municipal corporation

ESakal

Updated on: 

ठाणे : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील बहुतांश गाव-पाड्यांसह शहरेदेखील तहानलेली आहेत. ठाणे शहराला पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी, उपलब्ध स्रोतांवरील मर्यादा यामुळे पाणीपुरवठ्याचे भवितव्य चिंताजनक बनले आहे. शहराला दररोज ६२१ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात ५९० एमएलडीच उपलब्ध होत असल्याने तब्बल ३१ एमएलडीची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ठाणे महापालिकेने आता मुंबई महापालिकेकडे पिसे बंधाऱ्यातून दररोज ५० एमएलडी कच्चे पाणी देण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com