

Thane Municipal Corporation Election Results Winning Candidates
ESakal
TMC Election Result: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीचा भाग म्हणून १५ जानेवारी २०२६ रोजी महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डांमध्ये मतदान पार पडले आहे. यानंतर ठाणे महानगरपालिका (टीएमसी) निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेत शिवसेना सत्तेत आहे. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या काळापासून ठाणे महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यावेळीही एकनाश शिंदेंनी हा गड राखल्याचे पाहायला मिळत आहे.