

Thane Municipal Corporation
ESakal
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपली असून, आता नगरसेवक म्हणून ठाणेकरांच्या सेवेत रुजू होण्याची जबाबदारी १३१ नगरसेवकांच्या खांद्यावर आहे. यामध्ये पुरुष नगरसेवकांच्या खांद्याला खांदा लावून यंदा तब्बल ६९ रणरागिणी आपली कामगिरी बजावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ५० टक्के आरक्षणापेक्षाही जास्त जागांवर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत; मात्र विशेष म्हणजे शिंदे गटाच्या निवडून आलेल्या ७५ नगरसेवकांपैकी ४० महिला आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहामध्ये ‘ती’ चाच आवाज घुमणार आहे.