

Thane Municipal Corporation Mayor
ठाणे : ठाणे महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे ठाण्याचा प्रथम नागरिक बनण्याचा बहुमान यंदा अनुसूचित जातीला मिळणार आहे. महापलिकेच्या इतिहासात ३० वर्षांनंतर या घटनेची पुनरावृत्ती होणार आहे. १९९६मध्ये मनोहर गाढवे यांनी ठाण्याचे पहिले दलित महापौर बनण्याचा बहुमान मिळवला होता. त्यानंतर आता पुन्हा हा मान अनुसूचित जातीला मिळणार आहे. सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडे त्यासाठी सात नगरसेवक आहेत. त्यापैकी कुणाच्या गळ्यात ही माळ पडते, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.