
ठाणे : ठाणे पालिकेची डगमगलेली आर्थिक स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे, अशातच पालिकेवर असलेले दायित्वदेखील कमी होत आहे, तर दुसरीकडे पालिकेच्या विविध विभागांनी एप्रिल ते जून या कालावधीत ४१९ कोटींची वसुली केली असल्याची सकारात्मक गोष्ट समोर आली आहे. यामध्ये मालमत्ता करापोटी २९१ कोटी सर्वाधिक वसुली करीत आघाडी घेतली आहे.